कसाबपुरा छापा ! दोन जनावरे सुटली, १५० किलो गोमांस जप्त अकोला येथे ऑपरेशन प्रहारानंतरही गोवंश तस्करी सुरूच आहे. बोरगाव मंजू पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कसाबपुरा येथे छापा टाकून कत्तलीसाठी बांधलेली दोन जनावरे सोडवली. तसेच १५० किलो गोमांस, सुरा, कुऱ्हाड असा ९५, ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ९ सप्टेंबर रोजी ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली एसपी अर्चित चांडक व एसडीपीओ वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी अब्दुल रहीम शेख आणि मोहम्मद शोएब दिली