सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालेगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान दहशत पसरवणाऱ्या व संशयितांवर पोलिसांकडून विशेष नजर ठेवली जात आहे.या अंतर्गत, मालेगाव शहरातील गांधी नगर परिसरात पोलिसांनी छापा टाकला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रितेश इंगळे या युवकाच्या घराची झडती घेण्यात आली.यावेळी पोलिसांना धारदार तलवार आढळून आली.तलवार जप्त करून रितेश इंगळे याला तात्काळ अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्या