नदीहत्तरगा ता.निलंगा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाहणी केली..! अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावून मेहनतीने उभे केलेले पिक पाण्याखाली गेले असून अनेकांचे उत्पन्न कोलमडले आहे. या वेळी शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या व त्यांना धीर दिला. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर त्वरित उपाययोजना कराव्यात यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.