मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणातील आरोपी सोमनाथ कुंडलीक वाघमारे (रा. वेळापूर) याला पोलीसांनी २४ तासाच्या आत गजाआड केले. दरम्यान पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने या आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती मंगळवेढा पोलिसांनी आज गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजता दिली आहे. पिडीत मुलगी ही अन्य तालुक्यातील असून दि. २८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ती भावासह मंगळवेढ्यातील एका गावात आली होती.