औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर शिवारात वन्य प्राण्यापासून पीक संरक्षणासाठी जागलीवर गेलेल्या शेतकऱ्याची आखड्यावरून टीव्हीएस कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच ३८ एसी ८२३३ ही दुचाकी चोरून नेल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दरम्यान घडली याप्रकरणी शेतकरी गौतम पुंडगे यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर दिनांक सात सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता गुन्हा दाखल केला असून तपास पोनि जीएस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रविकांत हरकळ करत आहेत