मंद्रुप पोलिसांनी औंज (ता. दक्षिण सोलापूर) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण ₹१,४०,७४० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंद्रूप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंज येथील जिल्हा परिषद शाळेजवळ आरोपी गोलाकार बसून “मन्ना” नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्याकडून रोकड, पत्ते, मोबाईल, तसेच दोन दुचाक्या असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छाप्यावेळी दोन आरोपी पळून गेले असून त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.