यावल शहरा विस्तारित भागात गंगेश्वर महादेव मंदिर आहे तर सातोद रस्त्यावर शनी मंदिरात महादेव मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणी मंगळवारी हरतालिकेचा उत्साह दिसून आला. सकाळपासून सुहासिनींनी पूजेसाठी या ठिकाणी गर्दी केली होती. सायंकाळी चार वाजेपर्यंत सुहासिनींची मंदिरात गर्दी बघायला मिळाली.