ईद मिलाद-उन-नबी या पवित्र सणानिमित्त बीड शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेला हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभागी होऊन धार्मिकतेसह ऐक्याचे दर्शन घडवले. शोभायात्रेत इस्लामी ध्वज, पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणींचे संदेश असलेले फलक लावण्यात आले होते. यात्रेत लहान मुले, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा, धार्मिक गीते व "नबींच्या जयजयकाराच्या घोषणामुळे वातावरण भक्तिमय झाले.