महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सातारचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अर्थात ओबीसी महिलेसाठी आरक्षित असणार आहे. जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गण प्रारूप रचनेबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नसताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता जाहीर करण्यात आली आहे. त्यात सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी खुले झाले आहे.