जायकवाडी धरणातून कालपासून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला त्यामुळे घनसांगवी आणि अंबड विधानसभा मतदारसंघातील नदीकाठची 32गावे बाधित झाले. जवळपास पाच ते सात हजार नागरिकांचे पहाटेपर्यंत रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व गावकऱ्यांची व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.