यावल शहरात बाबूजी पुरा हा भाग आहे. या भागातील रहिवाशी मोहम्मद हन्नान खान वय ०६ हा मुलगा शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता होता त्याचा मृतदेह त्यांच्याच घरासमोर होणारा बिस्मिल्ला खलिफा यांच्या घरात एका कोठीत मिळाला. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर जमाव या भागात एकत्र झाला संशयित खलिफा याच्या दुकानावर दगडफेक झाली पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाला बोलावले आहे शहरात सध्या तणावाचे वातावरण आहे.