माळशिरस तालुक्यातील मळोली गावाजवळ सांगोला–अकलूज रस्त्यावर गुरुवारी दुपारी आयशर कंटेनर आणि दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनचालकांना किरकोळ दुखापत झाली असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 45 एएफ 7789 क्रमांकाचा आयशर कंटेनर सांगोला दिशेने पेंड घेऊन अकलूजच्या दिशेने जात होता. तर एमएच 16 सीडी 4955 क्रमांकाचा दुधाचा टँकर अकलूजवरून दूध घेऊन सांगोल्याकडे निघाला होता.