पारोळा-----तालुक्यातील धूळपिंप्री शिवारातून एका शेतातून दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचे चार गुरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमा साहेबराव पाटील या शेतकऱ्यांसह त्यांच्या भावाचे जवळपास २० गुरे हे शेतातील शेडमध्ये बांधलेली होती. ती रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.