आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील वाकडी या गावात वाकडी ते जानेफळ या मुख्य रोडवर पावसाचे व नालीचे पाणी साचल्याने ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे, या संदर्भात ग्रामपंचायत ,पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या कडे निवेदन दिले आहे मात्र काही फायदा झाला नाही तरी या कडे लक्ष द्यावे अशी मागणी गावातील तरुणांनी केली आहे.