आंधळगाव पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या सालेबर्डी येथे विषारी औषध प्राशन केलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना दि. 31 मे रोज रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. शालीकराम झंझाड असे मृतक इसमाचे नाव असून त्याने 29 मे रोजी आपल्या घरी विषारी औषध प्राशन केले असता त्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान शालिकराम झंझाड यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनेचा मर्ग दि. 3 जून रोज मंगळवारला दु. 2 वा. आंधळगाव पोलिसात दाखल करण्यात आला आहे.