राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी आता थेट माध्यमांसमोर येत रेणू शर्मा प्रकरणात एसआयटी (विशेष तपास पथक) नेमण्याची मागणी केली आहे. माध्यमांशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, “रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे प्रकरणात एसआयटी नेम व्हावी आणि आता अशा व्यक्तींनी इतर कुठल्याही प्रकरणावर सार्वजनिक टिप्पणी करू नये.” असाही टोला मुंडे यांना लावला