अकोल्यात सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत.अकोला शहरातील सिंधी कॅम्प भागात वीज कोसळली असून त्यावेळची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, वीज कोसळतानाचे भयानक दृश्य पाहून नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे..