हवामान खात्याचा अंदाजानुसार अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला तीन दिवसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी होणार असल्याचे सांगण्यात आलं होतं सायंकाळी आठच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहेत तसेच पावसाला सुरुवात होताच वीज देखील गेल्याने नागरिकांना उकाडाचा सामना करावा लागत आहे