संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे आणि आपला वर्धा जिल्हाही यात मागे नाही. वर्धेकरांसाठी अत्यंत खास असलेल्या केळकरवाडीच्या राजा' चे आज २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता शहरात आगमन झाले आहे.शहराच्या मुख्य मार्गावरून ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साही कार्यकर्त्यांच्या घोषणांनी केळकरवाडीचा राजा आपल्या मंडळाकडे निघाला.ठिकठिकाणी नागरिक आणि भक्तगण आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी आतुरतेने उभे होते तर उद्या सावंगी मेघे च्या राजाचे आगमन होणार आहे