गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी इचलकरंजी शहराला मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता भेट देऊन शहापूर पोलीस ठाण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता,अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव,डीवायएसपी विजयसिंह गायकवाड, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह विविध पोलीस अधिकारी उपस्थित होते.