लातूर-लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील थकबाकीदारांकडून मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल करण्यासाठी प्रलंबित प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज शनिवार, दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर महानगरपालिका यांच्या वतीने मुख्य कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.या लोकअदालतीस मोठा प्रतिसाद मिळाला. दुपारी १.३० वाजेपर्यंत तब्बल १५ लाख रुपयांचा मालमता कराचा भरणा झाला.