फलटण- दहिवडी रस्त्याच्या कामामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह सातारा येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी करून या विषयात निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. फलटण येथील लक्ष्मी विलास पॅलेस मधून शनिवारी सकाळी ११ वाजता माहिती मिळाली.