अकोला मार्गावरती रविवारी संध्याकाळी 6:00 वाजताच्या सुमारास कुटासा फाटा जवळ भरधाव वेगातील कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली हीकार भरधाव वेगात असल्याने अपघाताची मोठी भीषणता होती. जीवितहानी टळली असली तरी कारमधील काहीजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे या अपघातात कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे उपस्थितांनी तात्काळ यावेळी कारकडे धाव घेत यातील नागरिकांना बाहेर काढण्यात मदत केली तर यावेळी मार्गावर काही काळासाठी गोंधळाचे व वातावरण होते.