कोपरगाव बस्थानक परिसरात रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे आणि ऊबाठा सेनेच्या वतीने प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आज ८ ऑगस्ट रोजी एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी हातात केळे घेऊन प्रशासनाला प्रतीकात्मक इशारा दिला.आंदोलनाचं नेतृत्व उबाठा सेनेचे भरत मोरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिल गायकवाड यांनी केलं.