चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीतील बामादेही येथे तू शेतात का आला नाही"विचारले म्हणून काल सायं ७ वाजता फिर्यादी रामदास उर्फ रामनाथ बंडू मावस्कर वय वर्ष ४० यांना आरोपी करण रामदास मावस्कर याने काठीने मारहाण केली याबाबत फिर्यादी यांनी पोलिस स्टेशन चिखलदरा आज दुपारी 3:३० वाजता तक्रार दाखल केली.फिर्यादी हे घरी हजर असतांना आरोपी करण हा घरी आला. त्यावर फिर्यादी यांनी आरोपी यास मेरी तब्येत बरोबर नहीं थी तो तु आज खेत में क्यू नहीं आया असे म्हंटले असता आरोपीने काठीने फिर्यादी यांना मारहाण केली.