शिरोळ येथील गट क्रमांक 899 मधील शासनाच्या ताब्यातील भूखंड किरकोळ मोबदल्यावर बेघर नागरिकांना अटी व शर्तींसह वाटप करण्यात आले होते.मात्र,या भूखंडांच्या वाटपात प्रचंड आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते मंगेश नलावडे व राजू आवळे यांनी दिनांक 11 सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.या प्रकरणी भूखंडांचे लेआउट करणारे अभियंता श्रीकांत शंकर माळी व भांडवलदार सुरेश महादेव खडके यांनी संगनमत करून अनेक भूखंड हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.