ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात पंचायत राज संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्याला अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा बुधवार दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. या कार्यशाळेस पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, प्रभारी सीईओ शिरीष बनसोडे उपस्थित होते.