वडगाव डवरी गल्ली येथे संभाजी साळुंखे याचा खून करून फरारी झालेला आरोपी किरण जगताप याला करवीर तालुक्यातील परिते येथून जेरबंद केले असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.