मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अमली पदार्थाच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केले आणि त्यामागचे रॅकेट शोधून काढले. काही दिवसापूर्वी 21 लाखाच्या अमली पदार्थासह बांगलादेशी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तेलंगणात एमडी अमली पदार्थ बनवण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या टीमने तेलंगणातील फॅक्टरी उध्वस्त करून बारा हजार कोटी रुपयाचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला ची माहिती पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली.