जिल्ह्यात सद्यस्थित झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी बेजार झाला असतांना पुन्हा हातात येणारे सोयाबीन पिकांवर ऐनवेळी मोझॉक रोगाने प्रादुर्भाव केल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.याबाबतच्या तक्रारी आ.देवतळे यांना मिळतांच त्यांनी आज दि.9 सप्टेंबर ला 12 वाजता वरोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची पहाणी केली. शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी प्रशासन व स्थानिक लोक प्रतिनिधी यांना या बाबत निवेदन दिले होते.