सेनगांव तालुक्यातील माझोड या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली. याप्रसंगी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासह मान्यवरांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने या जयंती सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.