सोलापूर शहरातील कल्पना टॉकीजजवळ बार चालकाला चॉपरचा धाक दाखवून ₹५ हजार खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सूरज ऊर्फ नागेश शिवाजी महानूर (रा. सोलापूर) या आरोपीवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विनोद विजय मोटे (वय ३६, रा. गोल्डफिंच पेठ, चौपाड) हे बार चालक आहेत. ते २० ऑगस्ट रोजी दुचाकीवरून कल्पना टॉकीज ते निराळे वस्तीकडे जात असताना आरोपी सूरज महानूर याने त्यांच्या दुचाकीसमोर अडवून, “या एरियात धंदा करायचा असेल तर दरमहा दहा हजार द्यायचे, आत्ता लगेच पाच हजार दे”.