भंडारा शहरातील गांधी चौक रविदास वार्ड येथील शरद प्रभुजी तांडेकर वय 45 वर्षे हा दारूच्या व्यसनाधीन होता. दरम्यान दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजता पासून तो घरून निघून गेल्याने पोलीस स्टेशन भंडारा येथे कुटुंबीयांनी गुमबाबत तक्रार दिलेली होती. त्याचा शोध घेत असताना दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता दरम्यान भंडारा तालुक्यातील टेकेपार शिवारात वैनगंगा नदी पात्रात एका व्यक्तीचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची घटना उघडकीस आली.