कळंब शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण यंदा सलग तिसऱ्यांदा तुडुंब भरले आहे.दि.31 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा धरण ओव्हरफ्लो झाले.अॉगस्ट महीन्यातच धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने कळंब तालुक्यासह परीसरातील तब्बल १८ हजार २२३ हेक्टर शेतीला पाणीपुरवठ्याची हमी मिळाली आहे. कळंब तालुक्यातील खडकी,लोहटा पुर्व पश्चिम, करंजकल्ला,कोथळा,हिंगनगाव, दाभा,आवाड शिरपुरा,सौंदना अंबा, वाकडी आदी गावांचा शिवार पुन्हा हिरवाईने नटणार आहे.