कुरुंदवाड शहर व परिसरात २०२५चा गणेशोत्सव शांतता, सलोखा आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरा होत असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. या नियोजनाची यशस्वी अंमलबजावणी होत असून, सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे,अशी माहिती पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली.