भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी पॉइंटवर पल पल हॉटेल समोर आज दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. दरम्यान दोन मोटरसायकलीची आपसात धडक झाली. यात एका मोटरसायकल वरील दोघे भाऊ जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मिलिंद देवराव हुमणे वय 56 व राजेंद्र देवराव हुमणे वय 55 दोन्हीं रा. आंबेडकर वार्ड भंडारा हे मो. सा. क्र. MH 36 B 6109 ने कारधा वरून भंडाऱ्याकडे जात असता व भंडाऱ्यावरून लाखनी कडे जात असलेली अज्ञात मोटरसायकलने कारधा टी पॉईंटवर जब्बर धडक दिली.