बुलढाणा नगर पालिका प्रशासनाकडून श्री गणेश विसर्जनाची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच घरगूती लहान गणेश विसर्जनासाठी बुलढाणा शहरातील विविध भागात कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहे.मोठ्या गणेश मंडळांसाठी सागवन येथील पैनगंगा नदीवरील पूलावर बॅरिकेटिंग,वॉच टॉवर आणि विद्युत व्यवस्था करण्यात आली असून मोठ्या गणेश मंडळांनी या ठिकाणी गणेश विसर्जन करावे,असे आवाहन बुलढाणा मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.