हात भट्टी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका इसमास खामगाव ग्रामीण पोलिसांनी शहापूर देउळखेड येथे २७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान पकडले. व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ४४५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.कॉ. देवानंद चांदणे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहापूर देउळखेड येथे छापा टाकून लक्ष्मण सुरेश सैरिशे, वय 23 वर्षे, रा. शहापूर यास पकडले.पोलिसांनी त्याच्या ताब्यातून हात भट्टी दारू मोह साळवा प्लास्टिक कॅन जप्त.