आगामी काळातील सण उत्सव शांततेत साजरे व्हावे यासाठी आज रोजी धर्माबाद शहरातील माहेश्वरी भवन येथे तालुक्यातील शांतता समितीची बैठक ठेवण्यात आली होती, या बैठकीसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम व नुकतेच रुजू झालेले डी वाय एस पी पाटील हे देखील आवर्जून उपस्थित होते, ही बैठक दुपारी 12 ते 2 ह्या वेळेत संपन्न झाली असून शहरासह तालुक्यातील श्री मंडळाचे सदस्य राजकीय व्यक्ती व नगर पालिका तहसील विज वितरणचे अधिकारी उपस्थित होते.