पांढरकवडा तालुक्यातील दाभा येथील माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचे बंधू माजी सरपंच स्व. लालसिंग राठोड यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले.त्यामुळे आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी त्यांच्या निवासस्थानी राठोड कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी स्व. लालसिंग राठोड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहली.