कल्याण परिसराच्या अहिल्यानगर चौक येथे काही दिवसापूर्वी एका कामगाराला बेदम मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल आणि दुचाकी चोरून चोरटे पसार झाले होते. त्यानंतर बाजारपेठ परिसरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्यानंतर त्याची दखल घेऊन सीसीटीव्हीच्या आधारे भिवंडी परिसरातूनच श्रीकांत वाघमारे नावाच्या एका आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली असून त्याचा साथीदार फरार आहे. मात्र त्याचा शोध सुरू आहे. आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता,तो सीसीटीव्ही देखील समोर आला आहे.