धाराशिव मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.१० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता निदर्शने आंदोलन करण्यात आले. जन सुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत "रद्द करा रद्द करा" जन सुरक्षा कायदा रद्द करा अशा घोषणा देत जब जब मोदी डरता है पोलीस को आगे करता हैं अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला.