गेवराई तालुक्यातील कोलतेवाडी येथील शेतकऱ्यांच्या उसाला आग लागली. या आगीमध्ये सहा शेतकऱ्यांचा दहा ते पंधरा एकर ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदरील ही आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे सांगण्यात आले. वीजवितरण कंपनीकडे अनेक वेळा मागणी करूनही त्यांनी विजेच्या तारा व्यवस्थीत केल्या नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीकिसन रामभाऊ मुळुक, अंकुश रामभाऊ मुळुक, कचरू रामभाऊ मुळुक, लक्ष्मण बाबुराव आबदर, पांडुरंग शेषेराव जगताप यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान