सेनगांव शहरातील व्हि के देशमुख मंगल कार्यालयामध्ये कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांचा 25 ऑगस्ट रोजी भव्य नागरिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असुन त्या अनुषंगाने या नागरी सत्कार सोहळ्याला हिंगोली जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता शिवसेनेचे युवा नेते प्रितेश सरडा यांनी केले आहे.