महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 (एमपीआयडी अॅक्ट 1999) अन्वये ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री. जॉन्सन यांनी ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासंदर्भात संबंधीत विभागानी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला.