मुंबई आय आय टी मध्ये बिबट्याचा वावर नवीन नसून तरी देखील आय आय टी परिसरात भीती अद्यापही कायम आहे आज शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी बिबट्याच्या मुक्त संचार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून हा बिबट्या पोटासाठी शिकार शोधण्यासाठी वावरत असल्याचं ह्या दृश्यातून दिसत आहे. आय आय टी मुंबईतील मुख्य अतिथी भवन अर्थात गेस्ट हाऊस परिसरात हा बिबट्या मुक्त संचार करताना टिपला गेला आहे. तरी आय आय टी मुंबईत भयावय परिस्थिती कायम आहे.