क्षेत्रीय स्तरावर तलाठी साझा तसेच वरिष्ठ महसुली कार्यालयात महसूल सेवक (कोतवाल) २४ तास शासकीय सेवा देत असून महसूल सेवक (कोतवाल) आपली जबाबदारी योग्यरिता पार पाडत असतो. परंतु शासनाने अद्यापर्यंत महसूल सेवक (कोतवाल) पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्या प्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाही. त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवक (कोतवाल) यांना खूप अन्याय सहन करावा लागत आहे महसूल सेवक (कोतवाल) पदाचे महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवक (कोतवाल) यांना इतर महसूल कर्मचाऱ