सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धायरी येथील ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीने तब्बल २८ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला. फिर्यादींच्या व्हॉट्सअॅपवर कॉल करून पार्सलमध्ये अमली पदार्थ व बनावट कागदपत्रे सापडल्याचे भासविण्यात आले. स्वतःला दिल्ली टास्क फोर्सचा अधिकारी म्हणून सादर करून व्हिडिओ कॉलवर धमकी दिली. बँक खात्याची माहिती घेत फिर्यादींकडून रक्कम ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी