वाहन व्यावसायिक शाहिद अली अमजद अली यांचे पैशांच्या वादातून अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये अफजल अहमद जावेद इकबाल, सय्यद अतीफ जोहर सय्यद नसीम जोहर, कामरान नकीब अश्फाक अहमद आणि जमाल अहमद जावेद इकबाल यांचा समावेश आहे.पीडित शाहिद अली यांनी आरोपींकडून ४ लाख रुपये उसने घेतले होते. याच पैशांच्या वादातून २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता आरोपींनी शाहिद अली यांचे अपहरण केले.मारहाण केल्यानंतर आरोपींनी शाहिद अली यांना एका दुकानात डांबून ठेवले.