बुलढाणा जिल्हा परिषदेच्या छाननीमध्ये १३ तालुक्यातील १९२ कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ उचल्याचे आढळले आहेत. मेहकर तालुक्यातील एका सफाई कर्मचाऱ्यालाही 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे साफ केले. या सर्वांविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा कायदा नियमांतर्गत कारवाईचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी २८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता निर्गमित केले आहेत.